रामदेव बाबा आता फक्त योगगुरू राहिलेले नाहीत तर एक सेलिब्रिटी झाले आहेत. ते नेहमी अनेक
कार्यक्रमांना हजेरी लावत असतात. सोनी टी.व्ही. वर प्रसारित केल्या जाणाऱ्या ‘ सुपर डान्सर चाप्टर २’
या डान्स रियालिटी शो मध्ये रामदेव बाबांनी हजेरी लावली होती. त्यांच्या उपस्थितीमुळे स्पर्धकांचा उत्साह
सुद्धा द्विगुणीत झाला होता. या कार्यक्रमात रामदेव बाबांनी एका स्पर्धकाला एक अनोखी भेट दिली.
विशाल नावाच्या स्पर्धकाच्या कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीविषयी माहिती मिळताच त्या मुलाला मदत
म्हणून रामदेव बाबा यांनी चक्क त्याला भेट स्वरुपात एक गाय दिली. विशालच्या वडिलांनी
उदरनिर्वाहासाठी त्यांची गाय विकली होती. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाला उदरनिर्वाहाचे साधन पुन्हा मिळावे
या हेतूने रामदेव बाबांनी हि गाय त्याला भेट दिली.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews